Noties
Last Updated On Mar 22 2020 8:24PM
कार्यालयातील उपस्थिती ५ टक्क्यांपर्यंत सीमित करणेबाबत-सूचना
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने विद्यापीठ तसेच विभागीय केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची संख्या ५ टक्क्यांपर्यंत सीमित करण्यात येत आहे.
संबंधित विभाग, केंद्र, कक्ष तसेच सर्व विभागीय केंद्र प्रमुखांनी या अनुषंगाने नियोजन करावे. शक्य असेल तिथे घरून कार्यालयीन कामे करावी. अत्यावश्यक असेल तेव्हाच संबंधित प्रमुखांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे.
विद्याशाखांच्या कर्मचाऱ्यांनी घरून कामकाज करावे.
वरील निर्देश 31.3.2020 पर्यंत लागू राहतील.
-कुलसचिव